भजनी मालिका
← भजनांकडे परत

अकार उकार मकारांपरता सर्वेश्वर । कटीं धरुनी कर उभा विटे

akar ukar makaramparata sarveshvar | katin dharuni kar ubha vite

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अकार उकार मकारांपरता सर्वेश्वर । कटीं धरुनी कर उभा विटे ॥१॥ नीरा भीवरा संगम पुंडलीक मुनी । नारद वेणुनाद ऐसेंस्थळ लक्षुनी ॥२॥ योगियां हृदयींचें ठेवणें गोमटें । जोडलें उद्भटे पुंडलीका ॥३॥ आषाढी कार्तिकी आनंद सोहळा । संताचा मेळा घनवट ॥४॥ एका जनार्दनीं जनार्दन एकपणीं । त्रैलोक्यांचा धनी विटेवरी ॥५॥