भजनी मालिका
← भजनांकडे परत

अकार उकार मकार नामचि ठेविलें । शिवतेंहि केलें निराकार

akar ukar makar namachi thevilen | shivatenhi kelen nirakar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अकार उकार मकार नामचि ठेविलें । शिवतेंहि केलें निराकार ॥१॥ जीव शिव दोन्हीं विराले ज्यामाजीं । ते नाम सहजीं विठ्ठल होय ॥२॥ नामावीया नाहीं आणिकांसी ठाव । दुजा नाहीं भाव जीवां सर्वां ॥३॥ एका जनार्दनीं नाम घनदाट । भुवैकुंठ पेठ पंढरी देखा ॥४॥ हे पण वाचा: संत एकनाथांची संपूर्ण माहिती