भजनी मालिका
← भजनांकडे परत

अकार तो अकारु मकार तो मकारु । उकाराचा पालाऊ शोभे गे माय

akar to akaru makar to makaru | ukaracha palau shobhe ge may

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अकार तो अकारु मकार तो मकारु । उकाराचा पालाऊ शोभे गे माय ॥१॥ आदि अंत नसे ज्या रुपा वेगळें । तें कैसें वोळलें पुंडलिका गे माय ॥२॥ वेद उपरमला पुराणें कुंठीत । शास्त्रांची मती नेणत तया सुखा गे माय ॥३॥ जाणते नेणते सर्व वेडावले । ठकलेचि ठेलें सांगुं काय गे माय ॥४॥ या पुंडलिकें वेडविलें चालवुनि गोविलें । एका जनार्दनीं उभें केलें विटेवरी गे माय ॥५॥