भजनी मालिका
← भजनांकडे परत

अकळ तो खेळ नाकळे वेदांतीं । वाउलें कुंथती भारवाही

akal to khel nakale vedantin | vaulen kunthati bharavahi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अकळ तो खेळ नाकळे वेदांतीं । वाउलें कुंथती भारवाही ॥१॥ ऐसा तो अकळ न कळेची कळा । लावियेला चाळा सर्व जीवा ॥२॥ परस्परें एकएका पैं मैत्री । ऐशी चाले धात्री पंचभुतें ॥३॥ जगपटतंतु आपणचि होय । ऐसा हा निश्चय सत्ता ज्याची ॥४॥ एका जनार्दनीं सर्वसत्ताधारी । न माय चराचरी कीर्ति ज्याची ॥५॥