भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजिवरी होतों तुझे सत्ते खालीं । तोंवरी त्वा केली विटंबणा

ajivari hoton tujhe satte khalin | tonvari tva keli vitambana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आजिवरी होतों तुझे सत्ते खालीं । तोंवरी त्वा केली विटंबणा ॥१॥ आतां तुज राहों नेदीं या देशांत । ऐसा म्यां समर्थ केला धणी ॥ध्रु.॥ सापें रिग केला कोठें बाळपणीं । होतीसी पापिणी काय जाणों ॥२॥ तुका म्हणे म्यां हा बुडविला वेव्हार । तुझे चि ढोपर सोलावया ॥३॥