भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजि शिवला मांग । माझें विटाळलें आंग

aji shivala mang | majhen vitalalen ang

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आजि शिवला मांग । माझें विटाळलें आंग ॥१॥ यासी घेऊं प्रायश्चित्त । विठ्ठलविठ्ठल हृदयांत ॥ध्रु.॥ झाली क्रोधासवे भेटी । तोंडावाटे नर्क लोटी ॥२॥ अनुतापीं न्हाऊं । तुका म्हणे रवी पाहूं ॥३॥