भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजी दिवस धन्य झाला । संतसमागम पावला

aji divas dhanya jhala | santasamagam pavala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आजी दिवस धन्य झाला । संतसमागम पावला ॥१॥ बरवा फळला शकून । अवघा निवारला शीण ॥२॥ सुस्नात झालों । संतसमागरीं नाहलों ॥३॥ एका जनार्दनीं भावें । संतचरणीं लीन व्हावें ॥४॥