भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐवजानिमित्त धोंड्यासी आणिलें । कोंडोनी घातिलें घरामाजीं

aivajanimitta dhondyasi anilen | kondoni ghatilen gharamajin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐवजानिमित्त धोंड्यासी आणिलें । कोंडोनी घातिलें घरामाजीं ॥१॥ ऐकतांचि दामा क्रोधयुक्त जाहला । पुसे गोणाईला नाम्या कोठें ॥२॥ बैसला जाउनी काळ्याचे शेजारीं । फ़जिती ती थोरी मांडिली तेणें ॥३॥ एका जनार्दनीं ऐकोनियां मात । दामा आला धांवत राउळासी ॥४॥