भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐक्य तें जालिया मीतूंपण नाहीं । गौरव हा कांहीं नाहीं नामीं

aikya ten jaliya mitumpan nahin | gaurav ha kanhin nahin namin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐक्य तें जालिया मीतूंपण नाहीं । गौरव हा कांहीं नाहीं नामीं ॥१॥ नाहीं चतुर्दल तुर्याही उन्मनीं । स्वयंभ ती खाणी उभी उसे ॥२॥ चित्त जडलिया तेथें काय उणें । लज्जित साधनें होतीं देखा ॥३॥ एका जनार्दनीं नाहीं मीतूंपण । व्यापक तें जाण सर्वांठायीं ॥४॥