भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकोनी कीर्ति उदार संत । आला धांवत शरण

aikoni kirti udar sant | ala dhanvat sharan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐकोनी कीर्ति उदार संत । आला धांवत शरण ॥१॥ सांभाळावे सांभाळावें । सांभाळावें अनाथा ॥२॥ धरुनियां हाती हात । ठेवा मस्तकीं निवांत ॥३॥ एका जनार्दनीं एकपण । एका भावें आलों शरण ॥४॥