भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकोनी दुधाची बोली । का मनीं निष्ठुरता केली । श्रियाळ सत्वें राखिली । नगरी नेली वैकुंठा

aikoni dudhachi boli | ka manin nishthurata keli | shriyal satven rakhili | nagari neli vaikuntha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐकोनी दुधाची बोली । का मनीं निष्ठुरता केली । श्रियाळ सत्वें राखिली । नगरी नेली वैकुंठा ॥१॥ अंबऋषीच्या बोला । दाहीही अवतार नटला । माझे देखोनि उणिवाला । दूध कांहे न देसी ॥२॥ शरीर कर्वतीं भेदीन । अष्टांग योग साधीन । भक्तिबळे तुज काढीन । हुडकोनी तत्वतां ॥३॥ ऐकोनी तो शब्द करुणा । एका जनार्दनीं धांवे जाणा । माझिया भक्ताचिया वचना । उणिवता येऊं नेदी ॥४॥