भजनी मालिका
← भजनांकडे परत

आहे तें सकळ कृष्णा चि अर्पण । न कळतां मन दुजें भावी

ahe ten sakal krushna chi arpan | na kalatan man dujen bhavi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आहे तें सकळ कृष्णा चि अर्पण । न कळतां मन दुजें भावी ॥१॥ म्हणउनी पाठी लागतील भूतें । येती गवसीत पांचजणें ॥ध्रु.॥ ज्याचे त्या वंचलें आठव न होतां । दंड या निमित्ताकारणें हा ॥२॥ तुका म्हणे काळें चेंपियेला गळा । मी मी वेळोवेळा करीतसे ॥३॥