भजनी मालिका
← भजनांकडे परत

आहे तरिं सत्ता । ऐशा करितों वराता

ahe tarin satta | aisha kariton varata

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आहे तरिं सत्ता । ऐशा करितों वराता ॥१॥ अंगसंगाचीं उत्तरें । सलगीसेवेनें लेंकुरें ॥ध्रु.॥ तरो निकटवासें । असों अशंकेच्या नासें ॥२॥ तुका म्हणे रुची । येथें भिन्नता कैची ॥३॥