भजनी मालिका
← भजनांकडे परत

आहे ऐसा आतां आहे ठायीं बरा । ठेविलों दातारा उचितें त्या

ahe aisa atan ahe thayin bara | thevilon datara uchiten tya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आहे ऐसा आतां आहे ठायीं बरा । ठेविलों दातारा उचितें त्या ॥१॥ वचनाचा भार पडिलिया शिरीं । झालें मग भारी उतरेना ॥ध्रु.॥ अबोल्याची सवे लावुनियां मना । फाकों नेदीं गुणा ऐसें करूं ॥२॥ तुका म्हणे आम्हां गोंवळ्याचा संग । राखतें तें अंग जाणतसों ॥३॥