भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहर्निशी ध्यान शंकर धरींज्याचेंआ । तो श्रीराम वाचे कां रे नाठविसी

aharnishi dhyan shankar dharinjyachena | to shriram vache kan re nathavisi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अहर्निशी ध्यान शंकर धरींज्याचेंआ । तो श्रीराम वाचे कां रे नाठविसी ॥१॥ रामनाम म्हणतां तुटेल बंधन । होईल खंडन कर्माकर्मी ॥२॥ रामनामें गणिका नेली मोक्षपदा । तुटती आपदा गर्भवास ॥३॥ रामनाम जप नित्य ती समाधी । एका जनार्दनीं उपाधि तुटोनि गेली ॥४॥