भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहं सोहं वृक्षा तो निघाला वोहं । याचा शेंडा नाहीं मा कोठें कोहं

ahan sohan vruksha to nighala vohan | yacha shenda nahin ma kothen kohan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अहं सोहं वृक्षा तो निघाला वोहं । याचा शेंडा नाहीं मा कोठें कोहं ॥१॥ कान्होबा उघद माझें कोडें । बोल बोलती साबडे । अर्थ करे कां रे निवाडे ॥२॥ वृक्ष जाहला मन पवन । वृक्ष तो सहजचि हवन । वृक्षें वेधलें चराचर गहन रे ॥३॥ वृक्षे भेदिलें आकाश । एका जनार्दनीं निरवकाश । वृक्षचि जाहला अलक्ष रे ॥४॥