भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहंममता घारीपुरी । समुळ साधली दुरी

ahammamata gharipuri | samul sadhali duri

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अहंममता घारीपुरी । समुळ साधली दुरी ॥१॥ चतुर्विध केलीं ताटें । मानी शरण गोमटें ॥२॥ मन पवन समर्पिलें । भोग्य भोक्तृत्व हारपलें ॥३॥ एका जनार्दनीं भोजन । तृप्त झालें त्रिभुवन ॥४॥