भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहल्या जेणें तारिली रामें । गणिका परलोका नेली नामें

ahalya jenen tarili ramen | ganika paraloka neli namen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अहल्या जेणें तारिली रामें । गणिका परलोका नेली नामें ॥१॥ रामहरे रघुराजहरे । रामहरे महाराजहरे ॥ध्रु.॥ कंठ शीतळ जपतां शूळपाणी । राम जपे अविनाश भवाणी ॥२॥ तारकमंत्रश्रवण काशी । नाम जपतां वाल्मीक ॠषि ॥३॥ नाम जप बीज मंत्र नळा । सिंधु तरती ज्याच्या प्रतापें शिळा ॥४॥ नामजप जीवन मुनिजना । तुकयास्वामी रघुनंदना ॥५॥