भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहा रे मुढा अहा रे मूढा । जन्मोनी दगडा काय केलें

aha re mudha aha re mudha | janmoni dagada kay kelen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अहा रे मुढा अहा रे मूढा । जन्मोनी दगडा काय केलें ॥१॥ साठी घाटी करसी संसाराचा छंद । वाचे तो गोविंद नुच्चारिसी ॥२॥ एका जनार्दनीं श्रीरामावांचून । चुकवील बंधन कोण मूढ ॥३॥