भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहा रे अभाग्या काय केलें । फुकट नरदेह गामविलें

aha re abhagya kay kelen | phukat naradeh gamavilen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अहा रे अभाग्या काय केलें । फुकट नरदेह गामविलें ॥१॥ भजें भजें रामकृष्ण वासुदेव । वाउगा सांडोनी देई हेवा ॥२॥ मुळ संकल्प तोडोनिया टाकीं । अहंकार ममता वासना उपाधि शेखीं ॥३॥ एका जनार्दनीं टाकुनी परता होय । वाचे सदा गाय वासुदेव ॥४॥