भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहा गे पापिष्टे भजन भंगिलें । ताडनालागीं घेतलें काष्ठ हातीं

aha ge papishte bhajan bhangilen | tadanalagin ghetalen kashtha hatin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अहा गे पापिष्टे भजन भंगिलें । ताडनालागीं घेतलें काष्ठ हातीं ॥१॥ नेणवेची बाळ आपण तुडविलें । भजनाचें वाटलें दु:ख मनीं ॥२॥ घेऊनियां काष्ठ तांतडी धांवला । कां गे त्वा भंगिला नेम माझा ॥३॥ एका जनार्दनीं मारुं जाता घाय । तेव्हां कांता बोले काय गोरोबासी ॥४॥