भजनी मालिका
← भजनांकडे परत

आहा आहा रे भाई । नमो उदासीन झाले देहभावा । आळविती देवा तया नमो

aha aha re bhai | namo udasin jhale dehabhava | alaviti deva taya namo

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आहा आहा रे भाई । नमो उदासीन झाले देहभावा । आळविती देवा तया नमो ॥१॥ नमो तीर्थपंथें चालती तयांसी । येती त्यांसी बोळविती त्यां नमो ॥२॥ नमो तयां संतवचनीं विश्वास । नमो भावें दास्य गुरुचें त्यां ॥३॥ नमो तया मातापित्यांचें पाळण । नमो त्या वचन सत्य वदे ॥४॥ नमो तया जाणे आणिकाचें सुखदुःख । राखे तान भुक तया नमो ॥५॥ परोपकारी नमो पुण्यवंता । नमो त्या दमित्या इंद्रियांसि ॥६॥ तुका म्हणे नमो हरीचिया दासा । तेथें सर्व इच्छा पुरलीसे ॥७॥