भजनी मालिका
← भजनांकडे परत

अग्नीमाजी पडे धातु । लीन होउनि राहे अंतु । होय शुद्ध न पवे धातु । पटतंतुप्रमाणे

agnimaji pade dhatu | lin houni rahe antu | hoy shuddha na pave dhatu | patatantupramane

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अग्नीमाजी पडे धातु । लीन होउनि राहे अंतु । होय शुद्ध न पवे धातु । पटतंतुप्रमाणे ॥१॥ बाह्यरंगाचें कारण । मिथ्या अवघें चि भाषण । गर्व ताठा हें अज्ञान । मरण सवें वाहातसे ॥ध्रु.॥ पुरें मातलिया नदी । लव्हा नांदे जीवनसंधी । वृक्ष उन्मळोनि भेदी । परि तो कधीं भंगेना ॥२॥ हस्ती परदळ जो भंगी । तया पायीं न मरे मुंगी । कोण जाय संगी । पाणोवाणी तयाच्या ॥३॥ पिटितां घणें वरी सैरा । तया पोटीं राहे हिरा । तैशा काय तगती गारा । तया थोरा होऊनि ॥४॥ लीन दीन हें चि सार । भव उतरावया पार। बुडे माथां भार । तुका म्हणें वाहोनि ॥५॥