भजनी मालिका
← भजनांकडे परत

अग्निमाजी गेले । अग्नि होऊनी तेच ठेले

agnimaji gele | agni houni tech thele

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अग्निमाजी गेले । अग्नि होऊनी तेच ठेले ॥१॥ काय उरले तयापण । मागील ते नाम गुण ॥ध्रु.॥ लोह लगे परिसा अंगी । तोही भूषण जाला जगी ॥२॥ सरिता वोहळा ओघा । गंगे मिळोनी जाल्या गंगा ॥३॥ चंदनाच्या वसे । तृण चंदन जाले स्पर्शे ॥४॥ तुका म्हणे जवळा संता पायी । दुजेपणा ठाव नाही ॥५॥