भजनी मालिका
← भजनांकडे परत

अग्नि हा पाचारी कोणासी साक्षेपें । हिंवें तोचि तापे जाणोनियां

agni ha pachari konasi sakshepen | hinven tochi tape janoniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अग्नि हा पाचारी कोणासी साक्षेपें । हिंवें तोचि तापे जाणोनियां ॥१॥ उदक म्हणे काय या हो मज प्यावें । तृषित तो धांवे सेवावया ॥ध्रु.॥ काय वस्त्र म्हणे यावो मज नेसा । आपुले स्वइच्छा जग वोढी ॥२॥ तुकयास्वामी म्हणे काय मज स्मरा । आपुल्या उद्धारा लागूनियां ॥३॥