भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगत्य ज्या नरका जाणें । वीट मानणे कीर्तने

agatya jya naraka janen | vit manane kirtane

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अगत्य ज्या नरका जाणें । वीट मानणे कीर्तने ॥१॥ नावडेसा झाला बाप । आलें पाप वस्तीसि ॥ध्रु.॥ नारायण नाहीं वाचे । ते यमाचे अंदण ॥२॥ तुका म्हणे अभक्तासी । माता दासी जगझोडी ॥३॥