भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगम्य तुझा खेळ न कळे अकळ । ब्रह्मादिक वेडे जाले तेथें आम्हां कैचें बळ

agamya tujha khel na kale akal | brahmadik vede jale tethen amhan kaichen bal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अगम्य तुझा खेळ न कळे अकळ । ब्रह्मादिक वेडे जाले तेथें आम्हां कैचें बळ ॥१॥ कान्होबा भला भला तुं होसी । चोरी करुनि दिसों न देसी रे कान्होबा ॥२॥ चोरुनी शिदोर्‍या आमुच्या खासी । शेखी वळतीया धाडिसी रे कान्होबा ॥३॥ एका जनार्दनीं आमुचा होंसी । दास्यात्व करुनी दिसों न देसी कान्होबा ॥४॥