भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगाध भगवंतांची नामें । अगाध त्यांची जन्मकर्में

agadh bhagavantanchi namen | agadh tyanchi janmakarmen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अगाध भगवंतांची नामें । अगाध त्यांची जन्मकर्में ॥१॥ शिणले ते वाखाणितां । शेषा न कळें तत्त्वतां ॥२॥ रमा जाणों गेली । ती सुखें मौनावली ॥३॥ वेडावलीं दरुशनें । भांबावलीं तीं पुराणें ॥४॥ ऐसा उदार श्रीहरीं । शोभतसे भीमातीरीं ॥५॥ शरण एका जनार्दनीं । मीनला एकपणें जाऊन ॥६॥