भजनी मालिका
← भजनांकडे परत

अज्ञानीं विश्वासें साधून्सी वंदी । ज्ञानिया तो सदा तया निंदी

adnyanin vishvasen sadhunsi vandi | dnyaniya to sada taya nindi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अज्ञानीं विश्वासें साधून्सी वंदी । ज्ञानिया तो सदा तया निंदी ॥१॥ ऐशी उभयतांचि क्रिया । पाहतां चर्या एकची ॥२॥ वंदुं निंदूं कोणी ऐसा एक भाव । तेथें तो देव वसे सदा ॥३॥ ज्ञान अज्ञानाचा निवाडा होय । एका शरण जनार्दनीं जाय ॥४॥