भजनी मालिका
← भजनांकडे परत

अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती । तयाचिये मती बोध कैंचा

adnyanachi bhakti ichchhiti sampatti | tayachiye mati bodh kaincha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती । तयाचिये मती बोध कैंचा ॥१॥ अज्ञानाची पूजा कामिक भावना । तयाचिया ध्याना देव कैंचा ॥ध्रु.॥ अज्ञानाचें कर्म फळीं ठेवी मन । निष्काम साधन तया कैंचें ॥२॥ अज्ञानाचें ज्ञान विषयावरी ध्यान । ब्रम्ह सनातन तया कैंचें ॥३॥ तुका म्हणे जळो ऐसियांचे तोंड । अज्ञानाचें बंड वाढविती ॥४॥