भजनी मालिका
← भजनांकडे परत

आडवा तो उभा । असे दाटोनियां प्रभा

adava to ubha | ase datoniyan prabha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आडवा तो उभा । असे दाटोनियां प्रभा ॥१॥ देव नाहीं एकविध । एक भाव असे शुद्ध ॥ध्रु.॥ भेदाभेद आटी । नाहीं फार कोठें तुटी ॥२॥ तुका म्हणे गोवा । उगवा वेव्हाराचा हेवा॥३॥