भजनी मालिका
← भजनांकडे परत

आडलिया जना होसी सहाकारी । अंधळियाकरीं काठी तूं चि

adaliya jana hosi sahakari | andhaliyakarin kathi tun chi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आडलिया जना होसी सहाकारी । अंधळियाकरीं काठी तूं चि ॥१॥ आडिले गांजिले पीडिले संसारीं । त्यांचा तूं कैवारी नारायणा ॥ध्रु.॥ प्रल्हाद महासंकटीं रक्षिला । तुम्ही अपंगिला नानापरी ॥२॥ आपुलें चि अंग तुम्ही वोडविलें । त्याचें निवारलें महा दुःख ॥३॥ तुका म्हणे तुझे कृपे पार नाहीं । माझे विठाबाई जननीये ॥४॥