भजनी मालिका
← भजनांकडे परत

अडके कमळिणीं कोशीं । भ्रमरू जैसा आमोदासी

adake kamalinin koshin | bhramaru jaisa amodasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अडके कमळिणीं कोशीं । भ्रमरू जैसा आमोदासी ॥१॥ तैसा विषया लोधला । रामनामें विवंचला ॥२॥ कोरडें काष्ठ भेदोनि जाये । तो कमळदळीं गुंतला राहे ॥३॥ ऐसा विषयीक सायासी । एका जनार्दनीं धरीं मानसीं ॥४॥