भजनी मालिका
← भजनांकडे परत

अचुक साधन कष्ट नाहीं कांहीं । वाचे विठ्ठलरखुमाई म्हणे सुखें

achuk sadhan kashta nahin kanhin | vache viththalarakhumai mhane sukhen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अचुक साधन कष्ट नाहीं कांहीं । वाचे विठ्ठलरखुमाई म्हणे सुखें ॥१॥ जन्ममरणाच्या तुटतील खेपा । सोपा होय बापा मार्ग तुज ॥२॥ बहुत मार्ग बहुत साधन । परी वाचा जाण शीण दुर्गम तें ॥३॥ एका जनार्दनीं कष्ट ना सायास । म्हणा वाचे विठ्ठलास जीवेंभावें ॥४॥