भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभिनव गुरुनें दाखविलें । ओहं सोहं माझें गिळिलें

abhinav gurunen dakhavilen | ohan sohan majhen gililen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अभिनव गुरुनें दाखविलें । ओहं सोहं माझें गिळिलें ॥१॥ प्रपंचाचें उगवोनि जाळें । केलें षडवैरीयांचें तोंड काळें ॥२॥ उदयो अस्तावीण प्रकाश । स्वयें देहीं दाविला भास ॥३॥ मीपण नाहीं उरलें । एका जनार्दनीं मन रमलें ॥४॥