भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभिमानी पांडुरंग । गोवा काशाचा हो मग

abhimani pandurang | gova kashacha ho mag

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अभिमानी पांडुरंग । गोवा काशाचा हो मग ॥१॥ अनुसरा लवलाहीं । नका विचार करूं कांहीं ॥ध्रु.॥ कोठें राहतील पापें । जालिया हो अनुतापें ॥२॥ तुका म्हणे ये चि घडी । उभ्या पाववील थडी ॥३॥