भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभिमानासाठीं । वेंचिती तपाचिया कोटी

abhimanasathin | venchiti tapachiya koti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अभिमानासाठीं । वेंचिती तपाचिया कोटी ॥१॥ अभिमान दुर्वासासी । व्यर्थ शापिला अबंऋषी ॥२॥ अभिमान ब्राह्मीयासी । नेलें गाई गोप वत्सासी ॥३॥ अभिमान नाडला पूर्ण । विश्वामित्र ऋषि जाणा ॥४॥ एका जनार्दनीं शरण । समूळ सांडावा अभिमान ॥५॥