भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभेद भजनाचा हरीख । देव भक्ता जाहले एक

abhed bhajanacha harikh | dev bhakta jahale ek

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अभेद भजनाचा हरीख । देव भक्ता जाहले एक ॥१॥ कोठें न दिसे भेदवाणी । अवघी कहाणी बुडाली ॥२॥ हरपलें देवभक्तपण । जनीं जाहला जनार्दन ॥३॥ देवभक्त नाहीं मात । मुळींच खुंटला शब्दार्थ ॥४॥ एका जनार्दनीं देव । पुढें उभा स्वयमेव ॥५॥