भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभाविकांचे कर्म । तया न कळे कांहीं वर्म । संता म्हणती भ्रम । यासी झाला

abhavikanche karma | taya na kale kanhin varma | santa mhanati bhram | yasi jhala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अभाविकांचे कर्म । तया न कळे कांहीं वर्म । संता म्हणती भ्रम । यासी झाला ॥१॥ हरुषें मुखें नाम गाय । तया म्हणती वेडा होय अभाविकांचें भय । जन मनीं वाहे ॥२॥ बोले जैसा का भाट । वर्म कांहीं न कळे नीट । नामस्मरण स्पष्ट । न घडे तया ॥३॥ ऐशियाची संगती । न घडावी निश्चिती । एका जनार्दनींक अप्रीति । तयाची देवा ॥४॥